Miboli Marathi Shala Logo

 

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे शब्द नुसते गाण्यापुरते मर्यादित नाहीत. आपल्याला या सुंदर भाषेचा तितकाच अभिमान आहे. आपली मातृभाषा केवळ महाराष्ट्राबाहेरच नाही, तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेतही रुजावी, आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची  ओळख व्हावी आणि मराठी बोलता यावी या कल्पनेतून मायबोली मराठी शाळेची सुरुवात झाली. मराठीचा अभ्यास करताना मुलांना मराठी संस्कृतीच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न असतो.
 
आपल्या मुलांसोबत इतरही मुलांना मराठी शिकवावे या हेतूने ८-१० मुलांना सोबत घेऊन घरात सुरु केलेल्या या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे.  आज इथे १५०+ मुले-मुली मराठी शिकत आहेत. सर्व शिक्षिका आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, मनापासून मुलांना मराठी शिकवत आहेत.

मायबोली मराठी शाळेमार्फत अभ्यास व करमणुकीच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि सण यांची ओळख, मराठी बोलण्याचा सराव, या सगळ्या गोष्टींची सांगड घालत यंदा अनेक वेग-वेगळे कार्यक्रम आखले गेले होते. 


नवीन युगाशी जुळवून घेत ही आमची मायबोली शाळाही आपले रूप बदलून ऑनलाईन अस्तित्व निर्माण करत आहे. मुलांचा गृहपाठ, गुण (marks), उपस्थिती (attendance), हे सर्व आता पालक व मुले स्कूलॉजीच्या (schoology) माध्यमातून ऑनलाईन बघू शकतात,तसेच काही प्रश्न ,शंका असल्यास ते ही विचारता येतात. तसेच मराठी अभ्यासाची पुस्तके सुद्धा  इथे उपलब्ध आहेत. रवींद्र आपटे, तनया आपटे व पल्लवी मोहरीर यांनी शाळेसाठी ७० च्या वर प्रश्न उत्तरांचे खेळ (क्विझलेट) तयार केले आहेत, ज्यात मुले क्विझ घेऊ शकतात, चूक कि  बरोबर ओळखणे, रिकाम्या जागा भरणे, मराठीचे इंग्लिश किंवा इंग्लिशचे मराठी भाषांतर करणे असे विविध खेळ खेळू शकतात. याचा उपयोग अमेरिकेतील इतर मराठी शाळाही मराठी भाषेच्या सरावासाठी करत आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना अपडेट आणि आठवण करून देण्यासाठी आम्ही ई-मेल, WhatsApp आणि Facebook वापरतो.


मराठी भाषिकांना / शालेय मुलांना फायदा व्हावा ही महत्त्वाची नवीन ‘मराठी भाषा प्रवीणता चाचणी’ सुरु  झाली  आहे. भाषा प्राविण्य चाचणी देणारे अग्रगण्य प्रदाता "अवांट असेसमेंट" यांच्या मौल्यवान भागीदारी बद्दल धन्यवाद. आता ही परीक्षा देऊन मराठी भाषिकांना शालेय पत मिळवण्यासाठी पात्रता मिळू शकेल, स्टेट सील ऑफ बायलिटरसी आणि बायलिटरसी ग्लोबल सील. हा उपक्रम इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेत प्राविण्य दर्शविणा-या विद्यार्थ्यांना भाषेची प्रमाणपत्रे आणि हायस्कूल क्रेडिट्स देऊन द्वैभाषिकतेचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, टेक्सास राज्यात विद्यार्थी त्यांच्या प्रवीणतेच्या पातळीवर अवलंबून चार वर्षांपर्यंत पत मिळवू शकतात.  आत्तापर्यंत साधारण १००हून अधिक मुलांनी “Marathi High school credits” याचा लाभ घेतला आहे. Marathi High school credits साठीचे मार्गदर्शन शाळा करते.


शाळेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] वर Email करु शकता. शाळेच्या अधिक माहितीसाठी शाळेच्या वेबसाईट ला भेट दया.

Website: https://www.mibolimarathishala.com/

 

Miboli Irving       Miboli 2

 

Click here for Miboli Marathi Shala Operating guidelines.

 

Meet our Team

 

Miboli Shala Teachers