Happy Makar Sankrant मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
Hurry up and purchase event tickets. Most events are FREE for members.
Nimitz High School, 100 W Oakdale Rd, Irving, TX 75060
प्रिय मित्रांनो,
सणातला सण म्हणजे दिवाळी. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, रेखीव रांगोळ्या, नवीन कपडे, चविष्ट आणि खमंग फराळ ह्या सगळ्यांची सामुहिक आठवण घेऊन येते दिवाळी! डॅलस फोर्ट-वर्थ महाराष्ट्र मंडळातर्फे शनिवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सम्पन्न होणाऱ्या दिवाळी २०१७ सोहळ्याचे आपणास आग्रहाचं आमंत्रण! खमंग फराळ, विविध कलात्मक स्पर्धा, रुचकर मेजवानी, याबरोबरच या सोहोळ्याचे खास आकर्षण आहे प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं धमाल विनोदी नाटक, “साखर खाल्लेला माणूस”!
मंडळ सभासदांकरिता आगाऊ तिकीट विक्री ऑक्टोबर ९, २०१७ रोजी संध्याकाळी ८ वाजता सुरु होईल. सभासदांनी या संधी चा फायदा घेऊन सवलतीच्या दराचा आणि आसन वितरणातील प्राधान्याचा लाभ घ्यावा. आसन वितरण हे तिकीटविक्रीच्या क्रमाने केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. इतरांकरिता तिकीटविक्री ऑक्टोबर १३, २०१७ रोजी सायंकाळी ८ वाजता सुरु होईल.
कार्यक्रमाची रूपरेषा
सुरुवात | शेवट | कार्यक्रम |
३:०० | ४:३० |
स्वागत, फराळ आणि स्पर्धा
- हस्ताक्षर (७ ते १० वर्षे) - हस्ताक्षर (१० ते १३ वर्षे) - दीप सजावट (१३ वर्षांवरील मुली आणि महिलांसाठी) घरून सजवून स्पर्धेकरिता आणावे - किल्ला (संपूर्ण कुटुंबासाठी) घरून बनवून स्पर्धेकरिता आणावे -आकाश कंदील (संपूर्ण कुटुंबासाठी) घरून बनवून स्पर्धेकरिता आणावे |
४:४५ | ६:१५ | जेवण |
६:१५ | ६:३० | सभागृह प्रवेश, |
६:३० | ७:३० | पहिला अंक |
७:३० | ७:४५ | मध्यांतर, चहा- कॉफी, लहान मुलांसाठी पिझ्झा |
७:४५ | ९:०० | दुसरा अंक, स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण, कार्यक्रम समाप्त. |
धन्यवाद,
डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ समिती
Dear Members,
Start | End | Activities |
3:00 | 4:30 |
Registration, Diwali Faral & Competitions
Hastakshar 7-10yrs Hastakshar 10-13yrs Deep Decoration (13 years and older girls and ladies, make it home and bring it to the venue to participate) Killa Spardha (Family entry, make it home and bring it to the venue to participate) Akash Kandil Spardha (Family entry, make it home and bring it to the venue to participate) |
4:45 | 6:15 | Food |
6:15 | 6:30 | Auditorium entry & Childcare drop off |
6:30 | 7:30 | Natak – Pahila Ank |
7:30 | 7:45 | Interval – Tea/coffee break. Pizza for kids. |
7:45 | 9:00 | Natak – Dusra Ank, Prize distribution to competition winners. |
Thanks,
DFWMM Committee