New Mandal Year membership for (2019-2020) is open. Marathi School Enrollment for Irving is open (Membership required).

"कार्टी काळजात घुसली!"

मित्रहो,

आपल्या मंडळाचा नवीन वर्षाचा श्रीगणेशा गणरायांच्या स्वागताने होत असतो. दर वर्षी नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम आपण हाती घेत असतो. प्रत्येक वर्षी अनेक उत्साही मंडळी आपल्यात सामील होत असतात. गेलं वर्ष हे असंच प्रचंड उत्साहात गेलं. अनेक नवे कार्यकर्ते मिळाले, नवीन पायंडे पडले. गणपतीला ढोल-ताशा हवाच असं एक समीकरणच निर्माण झालं. मायभूमीशी असलेली आपली नाळ जपत दुष्काळग्रस्तांना आपण यथाशक्ति मदतही केली. शिवबांचा जयजयकार करणारी शिवजयंती साजरी केली. सर्वात मुख्य म्हणजे खूप जणांना हे मंडळ आता आपलं वाटू लागलं. आपण मंडळात केवळ पाहुणे म्हणून हजेरी लावत नाही तर आपल्याला स्वत:ला जायची ओढ म्हणून जातो असं एक नातं तयार झालं. हा असा उल्हास उरात बाळगून आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. या वर्षीही भरगच्च कार्यक्रम आहेत. उत्साह प्रचंड आहे. तरुण सळसळत्या रक्ताचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा चांगभलं! असं म्हणून सुरुवात करूया.

गणरायांचा उत्सव जवळ आला आहे. आपण या वेळी एक खुसखुशीत नाटक आणत आहोत. कलाकार दुसरे तिसरे कुणी नसून ते आहेत आपले अत्यंत लाडके नटश्रेष्ठ, प्रशांत दामले! आणि त्यांच्या बरोबर येत आहे "काहीही हं श्री" फेम तेजश्री प्रधान! होय, आपण "कार्टी काळजात घुसली!" हे वसंत सबनिसांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं नाटक डॅलस-फोर्टवर्थ मध्ये आणत आहोत. ११ सप्टेंबर रोजी! कार्यक्रम स्थळ नक्की होत आहे, त्याबद्दल अधिक माहिती वेळोवेळी देत राहूच. गणरायांचा जयजयकार, घनगंभीर अथर्वशीर्षाचा घोष, ढोल ताशांचा कडकडाट, बेभान लेझीम, पूर्णब्रम्ह वाटावे असे सात्विक भोजन, जोडीला मनमुराद हसवणारं नाटक! आणखी काय हवं? असा योग वर्षातून एकदाच! तेव्हा, तो चुकवू नका.

२०१६-१७ ची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. सभासद होण्याचे अनेक फायदे आहेत. सर्व कार्यक्रम सभासदांसाठी कमी दरात ठेवलेले असतात. कॅंपिंग, कोजागिरी, शिवजयंतीसारखे सारखे कार्यक्रम सभासदांसाठी अत्यल्प दरात किंवा पूर्ण मोफत असतात. मकरसंक्रांतीसारखा कार्यक्रम केवळ सभासदांसाठीच मर्यादित ठेवलेला असतो. संक्रांतीच्या विविधगुणदर्शनासारख्या कार्यक्रमांत केवळ सभासदांनाच सहभागी होता येते. असे अनेक फायदे आहेत. शिवाय, उत्तमोत्तम कार्यक्रम हे केवळ आपल्या आर्थिक पाठबळावर होत असतात. तेव्हा, कृपया नोंदणी करा. आणि एक लक्षात ठेवा, मंडळ समिती ही केवळ आखून दिलेल्या रूपरेषेनुसार काम करणारी उत्साही माणसे आहेत. त्या उत्साहात तुम्ही तुमचंही योगदान देऊ शकता, नवीन कल्पना सुचवू शकता, अंमलात आणू शकता. शेवटी हे तुमचं मंडळ आहे, तुम्हीच ते चालवायचं आहे.

शुभस्य शीघ्रम!

Click here to become a member or reniew your membership.

 

When: 
Monday, August 1, 2016 (All day)
[2019-2020] Membership
Price

2019-2020 Family Member

 • Advance ticket purchase for prime events

 • Discounted ticket pricing for all events

 • Discounted child care pricing

 • Talent Show participation

 • Access to "Members only" free events

 • Marathi Shalaa Admission

$40.00

2019-2020 Individual Member

 • Advance ticket purchase for prime events

 • Discounted ticket pricing for all events

 • Talent Show participation

 • Access to "Member's only" free events

$25.00
[2019-2020] Ganeshotsav
Price

[2019-2020] Ganeshotsav - VIP

 • Member Price $75

 • Non-Member Price $100

 • Ticket Price for Adult or Child is same

 • Seats will be allocated on first purchase first seat basis

$100.00

[2019-2020] Ganeshotsav - Preferred - Adult

 • Member Price $30

 • Non-Member Price $40

 • Preferred seats are located behind VIP section and in front of General section

 • Seats will be allocated based on first purchase first seat basis

$40.00

[2019-2020] Ganeshotsav - Preferred - Child (Age 3 to 14)

 • Member Price $15

 • Non-Member Price $22

 • Children below age 3 do not require event ticket but will not get an assigned seat in the auditorium

 • Preferred seats are located behind VIP section and in front of General section

 • Seats will be allocated based on first purchase first seat basis

$22.00

[2019-2020] Ganeshotsav - General - Adult

 • Member Price $25

 • Non-Member Price $35

 • Seats will be allocated based on first purchase first seat basis

$35.00

[2019-2020] Ganeshotsav - General - Child (Age 3 to 14)

 • Member Price $10

 • Non-Member Price $17

 • Children below age 3 do not require event ticket but will not get an assigned seat in the auditorium

 • Seats will be allocated based on first purchase first seat basis

$17.00

[2019-2020] Ganeshotsav - Childcare

 • Childcare available only during Main program in the Auditorium

 • EVENT CHILD TICKET MUST BE PURCHASED PRIOR TO PURCHASING CHILDCARE TICKET

 • CHILDCARE TICKET IS NOT VALID WITHOUT EVENT CHILD TICKET

 • Member (Child) - FREE

 • Non-member (Child) - FREE

Childcare Policy

 • Kids Aged 3 to 10 only

 • Child must be potty-trained to enroll in Childcare

 • Event Child ticket required to enroll in Childcare

 • Childcare is provided from 1:00 PM to 5:00 PM during the Main program in the Auditorium

 • Auditorium seating will not be allocated for kids in childcare

 • Parents will have to put smaller children in the lap if they bring them to the auditorium.

 • Parents are responsible for keeping kids quite in the auditorium

$0.00

[2019-2020] Ganeshotsav - Booth

 • Member: $50

 • Non-Member: $150

Terms & Conditions:

 • Committee will provide one table and two chairs for each booth

 • Maximum 2 persons allowed to manage the booth

 • Booth managers must purchase event ticket.

 • Booth allocation will be on "first come first serve" basis

 • Merchandise should have "reasonable price"

 • No Food items (for sale or personal) allowed on the booth

 • Political/controversial messaging will not be allowed

 • Committee is not responsible for any loss due to any reason 

 • Committee reserves the right to deny booth for non-conformance

$150.00
Click Here to View Cart                                                      Click Here to Checkout