Date
April 16th 2022
Time
8:00 AM
Venue
Richwoods Academy,

Detail Schedule

मंडळी,
तर उद्या आहे आपला क्रीडा महोत्सव! सर्वांची उत्कंठता खूप शिगेला पोहचलेली आहे. तर अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा:
१. ठीक ८ वाजता उदघाटन समारंभ आहे! त्यानंतर लगेच Sprint Races सुरु होतील.
२. मग सकाळच्या सत्रात टेबल टेनिस, थ्रोबॉल आणि त्यानंतर बॉक्स क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि लिंबू चमचा रेस असे खेळ आहेत. 
३. दुपारच्या सत्रात टेबल टेनिस, बॉक्स क्रिकेट, थ्रोबॉल आणि व्हॉलीबॉलचे राहिलेले सामने, रिले रेस आणि tug of war असे खेळ असतील.
४. कार्यक्रमाची शेवट पारितोषिक वितरणानं होईल!

८ Franchises, ११ खेळ, १६० च्या वर सामने आणि त्याच्या जोडीला ब्रेकफास्ट, लंच, लस्सी, चहा आणि आपल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच लहान मुलांसाठी Bounce House आणि आईस्क्रीम ट्रक!  फुल्ल टू धम्माल! एकदम नेक्स्ट लेवल!

पार्किंग जर फुल्ल असेल तर रिचवूड्स Academy च्या समोरच Baylor Scott & White Medical Center - Centennial हॉस्पिटलच पार्किंग साठी वापरू शकता. आणि हो, पाणी, सोडा वगैरे विकत घेण्यासाठी कृपया कॅश घेऊन या! लक्षात ठेवा, कार्यक्रम सकाळी बरोबर ८ वाजता सुरु होणार आहे, त्यामुळे वेळेवर भेटू!