नमस्कार मंडळी!
या वर्षातल्या आतापर्यंत झालेल्या मंडळाच्या सर्व कार्यक्रमांना दिलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! आता येत आहे ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत असा आगळा वेगळा भव्य क्रीडा महोत्सव! मागच्या वर्षीच्या पहिल्या क्रीडा महोत्सवाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर यावर्षी मंडळाने हा कार्यक्रम अजून जबरदस्त करायचं ठरवलं आहे! ८ franchises, त्यांचे नाव, Franchise Owners, जर्सी हे सगळं तर आहेच पण यावेळेस आपण करणार आहोत players चा live auction!! हो हो, चक्क Live auction! आहे का नाही फुल्ल टू धम्माल!
तर यावर्षीच्या क्रीडा महोत्सवाचं हे आहे थोडक्यात स्वरूप:
१. क्रीडा महोत्सवामध्ये असलेले खेळ (एकूण १२): बॉक्स क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, टेबल टेनिस, स्प्रिंट रेस, रिले रेस, लेमन स्पून रेस, टग ऑफ वॉर, बुद्धिबळ (चेस), कॅरम, खो खो, ब्रिज (फक्त सिनियर सिटिझन्स साठी)
२. क्रीडा महोत्सव स्थळ:
Vivian Field Middle School
13551 Dennis Ln,
Farmers Branch,
TX 75234
वेळ: सकाळी ८ पासून
३. हा Members Only कार्यक्रम आहे आणि सर्व भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना DFWMM च्या website वर तिकीट काढून RSVP करणे आवश्यक आहे!
४. या कार्यक्रमात ५ वर्षावरील सर्व जण भाग घेऊ शकतात. १८ वर्षाखालील सर्व जण जास्तीत जास्त ३ खेळात तर १८ वर्षावरील सर्व जण २ खेळात सहभाग घेऊ शकतात. Teams जाहीर झाल्यावर तुम्ही तुमच्या Franchise owner बरोबर सल्लामसलत करून कुठल्या खेळात सहभागी व्हायचं आहे हे ठरवू शकता.
५. तुम्हाला franchise owner होण्याची इच्छा असेल तर https://www.dfwmm.org/content/2022-2023-krida-mahotsav-2023-franchise-owner-entry-form या लिंक वर क्लिक करून फॉर्म पूर्ण भरा. Franchise owners ची नाव २३ मार्च ला जाहीर होतील.
६. RSVP करताना Auction किंवा Players pool या दोन पर्यायांपैकी एक पर्याय पूर्ण फॅमिली साठी निवडणे आवश्यक आहे. Auction पर्याय निवडल्यावर प्रत्येक खेळासाठी self skills assessment form पूर्ण करणे आवश्यक आहे. याची पूर्ण माहिती RSVP करताना/ तिकीट काढताना तिकिटाच्या SKU बरोबर उपलब्ध असेल.
७. पूर्ण family एकाच Franchise च्या टीम मध्ये असण्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे Auction किंवा Players pool हा पर्याय पूर्ण फॅमिली साठी applicable आहे.
८. Auction नंतर Franchise Owners आणि teams जाहीर होतील. त्यानंतर Franchise Owners आपल्या टीम साठी Team Building activities आणि practice sessions प्लॅन करतील.
९. हा पूर्ण दिवसाचा event असून मंडळाने पूर्ण दिवस वेगवेगळ्या फूड स्टॉल्स द्वारे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. तिकिटाच्या दरामध्ये जेवण included नाही आहे.
आणि या आहेत आगामी काही महत्वाच्या तारखा:
१. खेळाडू Tickets/RSVP open: 20 मार्च, २०२३ रात्री ९ वाजल्यापासून
२. Franchise Owners Nomination: 20 मार्च, २०२३ पासून
३. Franchise Owners ची नाव जाहीर: २६ मार्च २०२३
३. Live Players Auction: २ एप्रिल, २०२३ संध्याकाळी ५ ते ८ वाजता. ठिकाण: TBD
४. Final Teams Announcement: ३ एप्रिल, २०२३
५. क्रीडा महोत्सव: १५ एप्रिल, २०२३
प्रत्येक खेळाचे नियम, वेळापत्रक याबद्दल आम्ही येत्या काही आठवड्यात पुढील माहिती जाहीर करूच!
तर विसरू नका १७ मार्च ला रात्री ९ वाजता DFWMM च्या website (https://www.dfwmm.org/content/tickets) वर जाऊन क्रीडा महोत्सव साठी तिकीट काढून RSVP करायला!