Date
November 6th 2021
Time
6:30 AM
Venue
DFW Hindu Temple,

मंडळी, दिवळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

आपल्या मंडळाचा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शनिवारी ६ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता भाऊबीजेच्याच दिवशी DFW एकता मंदिर येथे आहे.

दीपोत्सवाची मजा लुटायची असेल तर आलं पाहिजे सूर्योदयाच्या म्हणजे ७ च्या आधी!!

खास दिवाळी निमित्त उद्या आपण भेटत आहोत मंडळाच्या एकत्रित कुटुंबाबरोबर शुभेच्छा द्यायला आणि एकत्र फराळ करायला!

तर 'दिवाळी पहाट' संबंधी काही महत्वाच्या सूचना:

१. शनिवारी सकाळी असणाऱ्या थंडीचा विचार करून मुख्य कार्यक्रम 'स्वर यात्रा' मंदिराच्या Cultural hall मध्ये करण्यात येणार आहे.

२. ह्या विनामूल्य कार्यक्रमाची तिकिटे संपली आहेत पण जर तुम्हाला या  कार्यक्रमाला येण्याची इच्छा असेल आणि तिकीट काढता आलं नसेल तर कृपया आम्हाला [email protected]  येथे संपर्क करा.

3. कार्यक्रमाला येणाऱ्या मंडळींसाठी चहा, लहान मुलांना हॉट चॉकलेट, गरम नाश्ता आणि दिवाळी फराळाचा बेत आहे.

४. कार्यक्रमाला  COVID शी  संलग्न CDC चे सर्व नियम  पाळले जातील (eg. Mandatory Masks inside).

स्थळ: DFW एकता मंदिर,

         Cultural Hall

         Irving

तारीख: शनिवार, ६ नोव्हेंबर २०२१

सकाळी ६:३० ते ७:२०: दीपोत्सव, फटाके, रांगोळी, चहा

सकाळी ७:२० ते ९:००: स्वरयात्रा (मंदिराच्या Cultural hall मध्ये)

सकाळी ९:०५ ते १०:३०: दिवाळी फराळ- नाश्ता आणि गप्पा

 

तेव्हा भेटूच शनिवारी सकाळी ६:३० वाजता!